MD Drugs esakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! सोलापुरातील अनेकजण नियमित घेतात 3000 ते 5000 रुपये ग्रॅम किंमतीचे MD ड्रग्ज; जेलरोड पोलिसांनी पकडलेला सुफियान अनेकदा सोलापुरात येऊन गेला, वाचा...

पुण्यातून ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही संशयितांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी त्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम तीन ते पाच हजार रुपये आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील काहीजण हे ड्रग्ज सतत घेतात.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यातून ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही संशयितांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी त्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम तीन ते पाच हजार रुपये आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील काहीजण हे ड्रग्ज सतत घेतात. एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांवर सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांत तीन वर्षांत चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. आता सोलापूर शहर पोलिस ही साखळीच शोधत आहे.

सुफियान हा मूळचा बुऱ्हाणपूर (ता. अक्कलकोट) येथील रहिवाशी असून तो यापूर्वीही ड्रग्ज घेऊन सोलापुरात आला होता, अशी माहिती जेलरोड पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. सोलापूर ग्रामीण व शहर पोलिसांनी यापूर्वी देखील एमडी ड्रग्ज घेऊन आलेल्यांवर कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज नियमित घेणारे सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये आहेत, त्यांना अवैध व्यवसायातील तरुण ड्रग्जच्या मागणीनुसार त्यांना ड्रग्ज पुरवठा करतात. सुफियान हा त्याच्या संपर्कातील लोकांना ड्रग्ज देण्यासाठी तो येत होता. बुधवारी (ता. २२) जेलरोड पोलिसांनी सुफियान व ताैफिक या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

यातील तौफिकविरुद्ध पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर सुफियान हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे, पण पुण्यात चुलत भावाकडे ट्रॅव्हल्स व्यवसायात कामाला होता. त्याला सोलापूर शहर-जिल्ह्यातील माहिती असल्याने तो नेहमीच सोलापुरात येत होता, अशी माहिती समोर आली आहे. तो सोलापुरातील कोणाकोणाच्या संपर्कात होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी जेलरोड पोलिसांनी त्या दोघांचेही मोबाईल जप्त केले आहेत.

तौफिकला घेऊन पथक मुंबईला

मुंबईतून एमडी ड्रग्ज घेऊन सुफियान व तौफिक हे पुण्यातून सोलापूरला आले होते. मुंबईतून त्यांनी कोणाकडून ड्रग्ज आणले होते, याच्या शोधासाठी जेलरोड पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. पोलिसांनी तौफिकला बरोबर नेल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT