Maratha Reservation  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : तीन नवीन GR, 12 मागण्यांचं सुधारित पत्र घेऊन शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला; खंडाळा गेस्ट हाऊसला होणार चर्चा

रात्री उशिरा यासंदर्भात चर्चा होईल. महत्त्वाचं म्हणजे शिष्टमंडळाने सोबत तीन नवीन जीआर, १२ मागण्यांचं एक सुधारित पत्र आणि एक रात्रपत्र आणल्याची माहिती आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला मोर्चा काहीही करुन रोखला जावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी दुपारी लोणावळा येथे अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत जरांगे यांची झालेली चर्चा फिस्कटली होती. आता पुन्हा एक शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी खंडाळ्यात दाखल झालं आहे.

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, खंडाळा गेस्ट हाऊसमध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ दाखल झालं आहे. रात्री उशिरा यासंदर्भात चर्चा होईल. महत्त्वाचं म्हणजे शिष्टमंडळाने सोबत तीन नवीन जीआर, १२ मागण्यांचं एक सुधारित पत्र आणि एक रात्रपत्र आणल्याची माहिती आहे.

नेमके जीआर कशासंदर्भातले आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, हे रात्री उशिरा कळू शकेल. खंडाळा येथील गेस्ट हाऊसमध्ये मनोज जरांगे पाटील शिष्टमंडळासोबत चर्चा करतील. त्यानंतरच मराठा मोर्चा मुंबईत धडकणार की नाही, याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.

इंदोरीकर महाराजांनी दिला पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांना विविध समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यातच राज्यातील नामवंत कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी पुढील तीन दिवसांचे कीर्तनाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. दि. २६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत इंदोरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT