Manoj Jarange Video esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Video : ''बोलून मोकळं व्हायचं!'' मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवर जरांगे पाटील संतप्त; म्हणाले...

संतोष कानडे

जालनाः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलंय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. जर हे सत्य असेल तर सरकारला समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल. सरकारला आपण एक महिन्याचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे बोलून मोकळं व्हायचं की काय, ते बघू.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सरकारने आता मराठा समाजाला वेठीस धरु नये. एक आंदोलक म्हणून जाहीर सांगतो, इच्छा नसतानाही आम्ही एक महिन्याचा वेळ सरकारला देत आहोत. त्यामळे तिघांनीही अशी विधानं करु नयेत, नसता समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल, असा इशाराच त्यांनी दिला.

व्हायरल संवादामध्ये नेमकं काय आहे?

एकनाथ शिंदेः आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवारः हो.. येस

देवेंद्र फडणवीसः माईक चालू आहे.

हा व्हिडीओ राज्यभर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो एडीट केलेला असल्याचं म्हटलं आहे. आम्ही मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत गंभीर आहोत, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेपूर्वीचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला आहे.

मात्र हा संवाद चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरवण्यात आलेला असून हा खोडसाळपणा आहे, मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत आम्ही काम करीत आहोत. तरीही मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT