manoj jarange narendra modi 
महाराष्ट्र बातम्या

'ये मनोज जरांगे कौन है, जिसने पूरी सरकार हिला डाला'; आंदोलनाची दिल्लीत चर्चा!

कार्तिक पुजारी

जालना- मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवसानंतर उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. जरांगे पाटील यांची समजूत काढताना राज्यातील सरकारला चांगलीच कसरत करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर एक किस्सा सांगितला. त्यांच्या आंदोलनाची चर्चा दिल्लीमध्ये सुद्धा सुरु आहे, असं शिंदे म्हणाले. (maratha andolan reservation protest manoj jarange patil)

मी दिल्लीला गेलो होता. त्यावेळी दिल्लीतील लोक मला विचारायचे 'ये मनोज जरांगे कौन है, जिसने पूरी सरकार हिला डाला'. मी त्यांना सांगायचो तो एक सामान्य कार्यकर्ता आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांचा हेतू प्रामाणिक आहे. ते समाजासाठी लढत आहे. वैयक्तिक स्वार्थ यात काहीही नाही. मी त्यांच्या वडिलांना सांगितलं की, तुमचा पोरगा भारी आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

मी मनोज जरांगेंना खूप वर्षांपासून ओळखतो. मी माझी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मी मनोज यांना फोन केल्यानंतर त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगायचो. इतके दिवस उपोषण केले आहे. त्यामुळे आता त्यांनी उपचार घ्यावेत. आमरण उपोषण करणं सोपं नसतं. त्यांनी आता लोकांचा मान राखाबा आणि तब्येत चांगली करा. म्हणजे पुन्हा आंदोलन करायला बळ मिळेल, असं ते म्हणाले.

मीही एका गरिब मराठा कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मला परिस्थितीची जाणीव आहे. मराठ्यांना कायम स्वरुपी आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. प्रोटोकॉल मोडून मी भेटीसाठी आलो आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी जरांगे पाटील यांना ज्युस पाजला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. जे जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात आंदोलनाला बसले होते. यावेळी आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन पेटले. जरांगे पाटील तत्काळ आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याने सरकारची चांगलीच दमछाक झाली. गेले १७ दिवस राज्यात आणि देशात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचीच चर्चा होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT