Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Esakal
महाराष्ट्र

'मराठा डे' ला संभाजीराजेंची पोस्ट; मराठा सैनिकांचा दरारा अन् आदर...

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं की छत्रपतींची पावण भूमी, शिवरायांचे मावळे अस समीकरण आहे. तांबडी मातीतील कुस्ती, गड- किल्ल्यांची पवित्र भूमी. याच भूमित ब्रिटिशांनी १७६८ मध्ये लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट(बॉंबे सिपॉय)ची (Maratha Light Infantry) स्थापना केली होती.याला आज २५० वर्ष पूर्ण झाली आहेत. देशातली हि सर्वात जुनी रेजिमेंट म्हणून याचा उल्लेख केला जातो. याच दिवसाला 'मराठा डे' (Maratha Day)म्हणून संबोधतात. या निमित्त खासदार संभाजीराजे छत्रपती ( Chhatrapati Sambhajiraje ) यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धावेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. संभाजीराजेंनी शूरवीरांना विनम्र अभिवादन केले आहे.

'मराठा डे' ला संभाजीराजेंची पोस्ट

आज 'मराठा डे' म्हणजे 'मराठा लाईट इन्फन्ट्री' चा स्थापना दिवस. सह्यगिरी कुशीतील महाराष्ट्रभूमी मधल्या सामर्थ्यवान, धैर्यवान, ध्येयवान, शिस्तप्रिय, कणखर आणि चपळ सैनिकांना घेऊन ब्रिटिशांनी १७६८ मध्ये लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट(बॉंबे सिपॉय) ची स्थापना केली होती. याला गतवर्षी २५० वर्ष पूर्ण झाले आहेत. देशातली हि सर्वात जुनी रेजिमेंट आहे. लढणं हा सैनिकांचा धर्म असतो. प्रत्येक रेजिमेंटचा असा एक गौरवशाली इतिहास असतो, त्यांच्या काही परंपरा असतात. छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोंढाणा जिंकला, ती लढाई 'मराठा लाईट इंफंट्री' मूळ प्रेरणा आहे. तोच दिवस साजरा केला जातो. करवीर छत्रपतींना आजही ह्या रेजिमेंट चे मानद, 'कर्नल ऑफ दी रेजिमेंट' म्हणून सर्वोच्च मानाचं पद दिल जातं.

पहिल्या महायुद्धाचा शेवट मराठ्यांनी केला

या रेजिमेंट चे घोषवाक्य आहे, 'बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय'. या गर्जना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांवेळी मराठा सैनिकांनी जगभर दिल्या होत्या. पहिल्या महायुद्धाचा शेवट तर मराठ्यांनीच केला होता. 'Battle of Sharqat' ही जगभरातल्या सैन्य लढ्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पहिल्या महायुद्धाला संपावणारी अशी विजयी घटना आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर प्रत्यक्ष करवीर अधिपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी भाग घेतला होता.

मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं

मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंट च्या 2nd मराठा बटालियन मधून त्यांनी हिटलरचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या फिल्ड मार्शल रोमेल विरोधात लढा दिला होता. रोमेलला 'वाळवंटातील कोल्हा' (Desert Fox) म्हणून ओळखले जायचे. आफ्रिकेतील या युद्धावेळी एक बॉम्ब त्यांच्या जवळ फुटला होता. नंतरच्या आयुष्यभर त्यांना एक कानाने ऐकू येत नव्हते. स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धवेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. म्हणूनच मराठा सैनिकांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर दरारा अन आदर आहे. भारतातील सर्व समाजाला आणि मराठा लाईट इन्फंन्ट्री मधील सर्व शूर सैनिकांना "मराठा डे" च्या हार्दिक शुभेच्छा..! आणि सर्व शूरवीरांना संभाजीराजे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

संभाजीराजें यांच्या या पोस्टला शिवप्रेमींनी कमेंट केल्या आहेत. एक मराठा लाख मराठा, जय शिवराय,छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या दूरदृष्टीने मूठभर मावळ्यांना नेतृत्व करता आले. अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत. आतापर्यत १७ हजार लोकांनी याला लाईक केले आहे. तर ६९८ जणांनी पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय ३४८ शिवप्रेमींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT