महाराष्ट्र बातम्या

मराठा मोर्चा रणशिंग फुंकणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मराठा समाजाला राज्य सरकारने अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यांची पूर्तना न केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवड्याभरात सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील योजना तात्काळ लागू कराव्यात आदी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.

समजाच्या मागण्यांसाठी संघटनेचे समन्वयक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात; मात्र मंत्री ती टाळतात. अशा मंत्र्यांना ताळ्यावर आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्यात येईल. आठवड्याभरात समन्वयकांची बैठक होणार असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT