Maratha Kranti Morcha demanded the arrest of Gunaratna Sadavarta wife Jayashree Patil  google
महाराष्ट्र बातम्या

'..तर गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीलाही अटक करा' : मराठा क्रांती मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर मुंबईतील किला कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. यामध्ये न्यायलायने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर अन्य १०९ आरोपींना १४ दिवासंची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashri Patil) यांना देखील अटक करा अशी मागणी केली जात आहे.

मराठा समाजाविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी एक वर्षापुर्वी तक्रार दिली होती, त्यावर कारवाई केली गेली नाही, तक्रारीची नोंद न्यायालयाने घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

सदावर्तेंना अटक होत असेल तर त्यांच्या पत्नीलाही अटक व्हावी, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या भागीदार होत्या, प्रक्षोभक भाषणं करुन मराठा समाजाची विटंबना करण्याचे प्रकार तीन-चार वर्षांपासून सुरु आहे. आमची तक्रार दाखल आहे, त्याची नोंद न्यायालयाने घ्यावी, प्रशासनाने देखील आणची तक्रार तुमच्या त्या तक्रारी सोबत जोडावी, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, न्यायलायने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी तर अन्य १०९ आरोपींना १४ दिवासंची न्यायालयीन कोठडी सुनावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT