morcha.jpg 
महाराष्ट्र बातम्या

मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत युती सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शिलेदार सोमवारी (ता. 26) मंत्रालयावर धडकणार आहेत.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावरून या मोर्चाला सुरवात होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आजवर राज्यभरात 58 मूक मोर्चे आणि दोन ठोक मोर्चे काढले. त्यानंतर सरकारने विविध योजनांसह आरक्षण दिले. मात्र, याचा कुठलाही फायदा मराठा समाजातील तरुणांना झालेला नाही. याउलट 2014 पासून मराठा समाजातील तरुण शिक्षण व नोकरीतून हद्दपार होताना दिसत आहे.

आजवर सरकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या; परंतु, सरकारच्या उपसमितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दरम्यान, यावर दोन दिवसांत तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या वेळी सकल मराठा मोर्चाचे समन्वयकदेखील उपस्थित होते. 

काय आहेत मागण्या? -
आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, 2014च्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्‍त्या द्याव्यात, 72 हजार मेगाभरती व एमपीएससीतील विद्यार्थ्यांना नियुक्‍त्या द्याव्यात, पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, नरेंद्र पाटील यांना तत्काळ निलंबित करा किंवा महामंडळ बरखास्त करा, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन करणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT