vinod patil maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Vinod Patil : ''कुठलाच निर्णय झालेला नाही, विनाकारण समाजात तेढ...'' याचिकाकर्ते विनोद पाटील स्पष्टच बोलले

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्याचं जाहीर करत मराठा मोर्चा मागे घेतला आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या हाती अधिसूचना देऊन लढा जिंकल्याच्या भावना व्यक्त केल्या.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्याचं जाहीर करत मराठा मोर्चा मागे घेतला आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या हाती अधिसूचना देऊन लढा जिंकल्याच्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी टिपण्णी करत, हा केवळ मसूदा असून १६ फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तोपर्यंत ओबीसी बांधवांनी हरकती नोंदवायच्या आहेत.. असं म्हणत मराठे ओबीसीमध्ये जात असल्याची भीती व्यक्त केली.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छगन भुजबळ यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घेण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हणणं चुकीचं आहे. एक मंत्री म्हणून भुजबळांनी असे बिनबुडाचे विधानं करु नयेत.

विनोद पाटील पुढे म्हणाले की, भुजबळांनी छातीवर हात ठेवून सांगावं, खरोखरच मराठा ओबीसीमध्ये आलाय का, खरोखर ५४ लाख नोंदींनुसार प्रत्येकी ४ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय का? तुम्हाला सगळं माहिती आहे, विनाकारण समाजात तेढ निर्माण करु नये.

विनोद पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी कुठलाच निर्णय झालेला नाही. सर्व मराठ्यांना अद्याप आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विनाकारण न्यायालयाची भाषा कशाला करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT