Laxman Hake-Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : फक्त दीड किमीचे अंतर पण.. अंतरवली आणि वडीगोद्री येथे काय घडतंय? आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तंग

Maratha Reservation Agitation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत.

रोहित कणसे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. यादम्यान यापासून जवळच वडगोद्री येथे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळाजवळ मराठा आणि ओबीसी समाज बांधव आमनेसमने आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वडगोद्री येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

अंतरवाली सराटी येथे पाच दिवसापासून मराठा आरक्षण करीता मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. यादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री जरांगे यांची तब्येत खालावली होती या ठिकाणी मंत्री शंभूराजे देसाई यांनी फोनवर चर्चा केल्यावर व उपस्थित नागरिक यांच्या विनंतीवरुन मनोज जरांगे यांनी वैघकिय उपचार ( सलाईन) लावली आहे.

मराठा आरक्षण व मागणीबाबत आपल्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. जरांगे यांनी गेल्या 17 सप्टेंबरपासून आपले सहावे आमरण उपोषण या ठिकाणी चालू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा शनिवार ता.21 रोजी पाचवा दिवस आहे. चार दिवसात जरांगे यांची तब्येत खालावली होती या मुळे रात्री अंतरवाली सराटी येथे मोठा जनसमुदाय त्यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होता.

ओबीसी-मराठा आंदोलक आमचे सामने

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषण करत आहे. तर वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके , नवनाथ वाघमारे व सोनिया नगर अंतरवाली सराटी येथे ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे व सहकारी यांचे उपोषण सुरू आहे.

यादरम्यान शुक्रवारी रात्री वडीगोद्री येथे मराठा व ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अंतरवाली सराटी या गावाकडे जाण्यासाठी काही गाड्यांना पोलीसांनी रोखले तसेच दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितले. वडीगोद्री येथुन अंतरवाली हे दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी याच रस्त्याने जाण्याचा आग्रह होत असल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत.

अंतरवालीकडे जाण्यासाठी काही गाड्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी वाहाने दुसऱ्या मार्गाने नेण्यासाठी सांगीतले. यामध्ये आंदोलक समोरा समोर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पोलीसांनी दोन्ही आंदोलकांना शांत केले. पोलीसांनी मोठा फौजफाटा येथे तैनात केला असून परीस्थीती नियत्रणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT