महाराष्ट्र बातम्या

Hingoli OBC Sabha: "आमची लायकी नाही तर आमच्या पंगतीत कशाला येताय"; बबनराव तायवाडेंचा जरांगेंवर हल्लाबोल

Sandip Kapde

Hingoli OBC Sabha : हिंगोली येथे ओबीसींचा महामेळावा पार पडला. मंत्री छगन भुजबळ या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद रंगला आहे.

बबनराव तायवाडे म्हणाले, आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. मंडल आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला सुपर फॉरवर्ड कास्ट म्हटले आहे. आतापर्यंत सहा अहवाल प्रसिद्ध झाले पण मराठा समाज मागास आहे, असं सिद्ध झालं नाही. त्यामुळे ओबीसींनी काय चोरलं हे मराठा आंदोलकांना सांगावं. आमच्यावर खोटे आरोप लावता. आमच्या नेत्यांनी विरोध केला तर शिविगाड करता. हा अधिकार तुम्हाला नाही. (Latest Marathi News)

मनोज जरांगे ओबीसी, एसी, एसटी यांचा अपमान करत आहेत. आमची लायकी नाही तर आमच्या पंगतीत कशाला येताय. आमची लायकी काढण्याची तुमची लायकी नाही. मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध करतो. यापुढे ओबीसींविरोध बोलले तर महाराष्ट्रात त्यांचे फिरणे बंद करु. आम्ही आतापर्यंत शांत होतो. पण आता आमचा अपमान होत आहे. आम्ही ४०० जातीचे ६० टक्के लोक आहोत. याची जरांगेंनी दखल घ्यायला हवी, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

जरांगे म्हणतात, ३२ लाख नोंदी सापडल्या म्हणजे ३२ लाख मराठे आता ओबीसीत आले. हे आपल्याला मूर्ख समजत आहेत. मात्र आम्ही आमच्या संविधानिक अधिकारचे रक्षण करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

Diwali Party Snack Recipe: दिवाळीत चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा कुरकुरीत चणा चिली, लगेच नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

SCROLL FOR NEXT