Chhagan Bhujbal on manoj jarange patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : पवार-भुजबळ भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ते लय बेईमानी...

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ कुठे गेले काय आणि राहिले काय.. याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. ते लय बेईमान आहेत. लय बेइमानी करतात. जिथे खातात तिथेच घाण करतात. त्यांच्या नरड्यात किती हात घाला.. हात कोरडाच निघणार. ते कोणाचेच नाहीत ते फक्त स्वतःच घर कसं भरेल, हेच बघतात.

संतोष कानडे

मुंबईः मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्यानंतर भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं. राज्यामध्ये समाजासमाजात तेढ निर्माण होत असून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पवारांच्या कानावर घातल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यावर पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये अर्धा ते पाऊन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीनंतर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर तोंडसुख घेतलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ कुठे गेले काय आणि राहिले काय.. याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. ते लय बेईमान आहेत. लय बेइमानी करतात. जिथे खातात तिथेच घाण करतात. त्यांच्या नरड्यात किती हात घाला.. हात कोरडाच निघणार. ते कोणाचेच नाहीत ते फक्त स्वतःच घर कसं भरेल, हेच बघतात.

शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळ म्हणाले...

शरद पवारांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. पण, मी त्यांना भेटायला गेलो. तब्येत ठीक नसल्याने ते झोपले होते. मी दीड तास थांबलो. ते उठल्यानंतर मी गेलो आणि आमच्यात चर्चा झाली. दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की, राजकारण घेऊन आलो नाही. आमदार-मंत्री म्हणून आलो नाही. पण, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण, आता राज्यात काही ठिकाणी स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, असं मी त्यांना सांगितलं असं भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT