Shamburaj Desai 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan: मराठा आंदोलकांची रात्री उशिरा शंभुराज देसाईंसोबत दीड तास चर्चा; बैठकीत निघाला महत्त्वाचा तोडगा

Maratha protestors meeting with Shamburaj Desai: मनोज जरांगे यांचं सुरू असलेलं आंदोलन लवकरात लवकर कसं थांबवता येईल याविषयी शंभूराज देसाई आणि शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मराठा आंदोलक आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात रात्री दीड तासानंतर बैठक संपली. मराठा आंदोलकांपैकी पाच जणांचे शिष्टमंडळ मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत आज सकाळी 12 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मराठा आंदोलकांचा शंभूराज देसाई यांच्यासोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे यांचं सुरू असलेलं आंदोलन लवकरात लवकर कसं थांबवता येईल याविषयी शंभूराज देसाई आणि शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारने आतापर्यंत कोणती कोणती पावले उचलली त्याविषयी शंभूराज देसाई यांनी आंदोलकांना माहिती दिली आहे.

शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील आणि निवृत्त न्यायमूर्ती यांची समितीची बैठक सोमवारी होणार होती. ती बैठक रविवारी कशी घेता येईल यासाठी प्रयत्न करणार, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी आंदोलकांना दिली. निवृत्त न्यायमूर्तींची वेळ घेऊन ही बैठक लवकरात लवकर घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शंभुराज देसाई यावेळी म्हणाले की, पुण्यातून काही मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे अशी त्यांची मागणी आहे, मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांना चर्चा करायची होती, मात्र मुख्यमंत्री मुंबईत नाहीत. आज मी स्वतः सर्व आंदोलकांशी चर्चा केली. मी सगळी माहिती आंदोलकांना दिली

उद्या पुण्याहून आलेल्या पाच आंदोलकांची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक करणार आहे. माजी न्यायमूर्तींसोबत सोमवारी सरकारची बैठक आहे. मात्र आंदोलकांची इच्छा आहे की उद्याच बैठक घ्यावी. उद्या सकाळी न्यायमूर्ती यांच्यासोबत चर्चा करून उद्या बैठक घेता येईल का याबाबत चर्चा करणार आहे, असं ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT