महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : ''मी आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही अन् कोणताच मराठा...'' नारायण राणेंनी मांडली वेगळी भूमिका

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेलं असताना भाजप नेते नारायण राणे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी १४ ऑक्टोबर रोजी लाखोंची सभा घेत सत्ताधाऱ्यांना हादरा दिला. आता त्यांनी २२ ऑक्टोबरला पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. २४ तारखेला सरकारला दिलेला अल्टिमेटम संपत असून मराठा आंदोलक काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

विशेष म्हणजे, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मनोज जरांगेंची मागणी आहे. परंतु अनेक नेत्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे.

सरकारने महिन्याभरापूर्वी एक समिती स्थापन करुन मराठावाड्यातील मराठा समाजाच्या जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहे. निजमाकालीन आणि त्यापूर्वीच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर तोच पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी होत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र या आरक्षणाला विरोध केला आहे.

राणे म्हणाले की, कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे आहेत. त्यामुळे मीसुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही.

''मराठा आणि कुणबी एकच असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. परंतु ते तसं नाही. मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे, तसा तो जरांगे पाटलांनीही करावा.'' असा सल्ला नारायण राणेंनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT