manoj jarange laxman hake esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : २८८ आमदार निवडून आणायचे की पाडायचे? जरांगेंचा फैसला? भूमिका केली स्पष्ट...

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांनी थोडी सावध भूमिका घेत १३ तारखेला याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. २८८ जागा लढायच्या की पाडायच्या, याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याचा कायदा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष कानडे

Maratha Resrvation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतली आहे. दुसरीकडे मात्र ओबीसींच्या नेत्यांनी वज्रमूठ आवळली असून सगेसोयऱ्याच्या मुद्द्याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असून मनोज जरांगे यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीबद्दल भूमिका घेणार असल्याचं म्हटलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही प्रत्यक्ष भूमिका घेतली नव्हती. तरीही त्यांनी 'ज्याला पाडायचं त्याला पाडा' असा संदेश दिला होता. त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जागांवर आणि इतर काही जागांवर जरांगे फॅक्टरने काम केलं.

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांनी थोडी सावध भूमिका घेत १३ तारखेला याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. २८८ जागा लढायच्या की पाडायच्या, याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याचा कायदा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे मनोज जरांगे पाटील उपचार घेत होते. मंगळवारी त्यांन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट आंतरवाली सराटीत गेले आणि उपस्थितांना संबोधित केलं. छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. राज्यामध्ये मराठा आणि ओबीसींच्या दंगली घडवण्याचं छगन भुजबळ यांचं स्वप्न आहे, पण ते आपल्याला पूर्ण होऊ द्यायचं नाही.. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल आणि ओबीसी नेत्यांबद्दल बोलताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, १९६७ मध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. उर्वरित समाजाला १९९४मध्ये मिळालं. मात्र मराठ्यांना १८८४ पासून म्हणजे दीडशे वर्षांपासून कुणबी हे ओबीसीतलं आरक्षण आहे. ओबीसींच्या यादीमध्ये ८३ क्रमांकावर कुणबी जात आहे.. आणि कुणबी-मराठा, मराठा-कुणबी एकच आहेत. म्हणूनच २००४ चा जीआर दुरुस्त करुन मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT