antarwali sarati manoj jarange patil strike maratha reservation deny to medical care politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

शांत राहा नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल; जाळपोळीच्या घटनेनंतर जरांगे पाटलांचं वक्तव्य

कार्तिक पुजारी

जालना- कोट्यवधी असलेला मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जे लोक हिंसाचार करत आहेत ते मराठा समाजातील नाहीत. जाळपोळ करु नका, हिंसा करु नका. हे कोण करतंय याची मला शंका येत आहे. मला कुठेही जाळपोळ व्हायची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

जोळपोळीच्या घटनेचे मी कधीही समर्थन करत नाही. त्यामुळे सध्या जी जाळपोळ सुरु आहे, ती तात्काळ थांबवावी. नाहीतर मला नाईलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. गोरगरिब मराठ्यांना हे अपेक्षित नाही. मी चौकशी करणार आहे की हिंसक आंदोलन कोण करत आहे. बहुतेक मला शंका आहे की सत्ताधारी नेतेच स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या हाताने आपली घरं जाळून घेत आहेत. मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करायचं आहे. मला त्रास होईल असं काही करु नका. मराठा समाजाने याची काळजी घ्यावी. उद्रेक करण्याची गरज नाही. तीसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावच लागेल. जे हिंसाचार करत आहेत ते सामान्य कार्यकर्ते नाहीत. हे सरकारचे कार्यकर्ते असल्याची शंका आहे. सगळ्यांनी जाळपोळ बंद करा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

आपण कुणाच्या दारात जायचं नाही. ते आपल्या दारात आल्यास आपण बघु. पण, आज रात्रीतून सर्व जाळपोळ थांबावी. अन्यथा, उद्या मला वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो. माझा जीव महत्त्वाचा समाजाला वाटत असेल तर मी मान राखून पाणी पितो. पण, राज्यात शांतता ठेवावी. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण, आरक्षण घेईपर्यंत आमरण उपोषण थांबवू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT