Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: आमदारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी कारवाईला सुरवात; 26 जणांना कोठडी

कार्तिक पुजारी

बीड- बीड जिल्ह्यात आमदारांच्या घरांवरील हल्ल्याप्रकरणी २६ जणांना ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. तर अन्य १५ जणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आमदारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. बीडमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण धारण केले. याठिकाणी सोमवारी माजलगावचे आमदार सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या घराला आणि वाहनाला आग लावण्यात आली. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्यात आले. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना सुरु झाल्या होत्या.

आंदोलनकर्त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घराला आग लावली. त्यांनतर काही वेळाने आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावून दिली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणाची गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता कारवाईला सुरवात झाली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला होता. जिवे मारण्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्याच इशारा त्यांनी दिला होता. यामध्ये काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. सीडीटीव्ही फुटेज मिळाले असून त्याआधारे सत्य बाहेर येईल, असं फडणवीस म्हणाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT