महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : बीडमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर धनंजय मुंडे आक्रमक; 'या' मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

संतोष कानडे

बीडः मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये जिथे हल्ले झाले त्या भागाची पाहाणी करुन धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे.

बीडमध्ये झालेल्या हल्ल्यांचा विचार केल्यास काही ठाराविक लोकांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून झालं आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

रविवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात कधीच अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातील निमित्त होतं. प्रकाश सोळंके यांच्या ऑडिओ क्लिपमधील अर्थाचा अनर्थ करुन बीड जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

''आरक्षणाची अनेक आंदोलनं देशाने बघितली. परंतु असं एखाद्याला नेस्तनाभूत करण्याचं काम झालं नव्हतं. बीड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यापासून, व्यावसायची ठिकाणं जाळण्यापासून जे काही प्रकार घडले त्याचा मी जाहीर निषेध करतो..''

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, या घटनांमागे फारमोठं षड्यंत्र दिसून येत आहे. मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचं काम केलं जातंय. पोलिस माजलगावला रवाना झाले होते, त्यामुळे बीडमध्ये हल्ला झाला. बीडमध्ये ठाराविक ठिणावरच एकेक व्यक्ती, त्यांचं घर, त्याचा व्यवसाय बघून हल्ले केले गेले. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT