Manoj Jaranage Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर तुमची गाठ आमच्याशी - मनोज जरांगे पाटील

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर तुमची गाठ आमच्याशी, असा इशारा राज्यातील मराठा आमदारांना जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर तुमची गाठ आमच्याशी, असा इशारा राज्यातील मराठा आमदारांना जरांगे पाटील यांनी दिला आहे. आपल्या मतदार संघातील मराठा आमदारांना यासाठी निवेदन द्या, अश्या सूचना जरांगे यांनी मराठा समाजाला दिल्या आहेत.

मुंबईत मराठा समाजाचे नेते अॅड. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या प्रथम स्मृतिदिन दादर येथील श्री शिवाजी मंदिरात आदरांजली कार्यक्रम ते बोलत होते.

आप्पासाहेब यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावरही आहे. त्यानी खऱ्या खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता. गेली ४५ वर्षापासून आरक्षणासाठी लढाई सुरू आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. शेवटच्या लढाईत सर्व मराठा बाधवाणी पुन्हा एकदा ताक लावण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले आहे.

तसेच माझ्याजवळ प्रामाणिकपणा शिवाय समाजाला देण्यासाठी काहीही नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचेही जारांगे यांनी सांगितले.

मराठा समाजाचे नेते अॅड. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या प्रथम स्मृतिदिन दादर येथील श्री शिवाजी मंदिरात आदरांजली कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत, अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेक्रेटरी युद्धविर सिंग, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, आमदार भाई जगताप, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT