Maratha Reservation Sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आरक्षणासाठी तरूणाचं 15 दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली, ICUमध्ये दाखल | Maratha Reservation

हा तरूण मागच्या 15 दिवसांपासून उपोषण करत असून त्याची प्रकृती खालावली आहे.

दत्ता लवांडे

नांदेड : मराठा आरक्षणाचा वापर अनेकांनी राजकीय हत्यार म्हणून केला. सरकारे बदलली, आंदोलने झाले, उपोषणे झाले, मोर्चे झाले पण मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळू शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर अजूनही हा तिढा सुटला नाही. पण मराठा समाजात आरक्षणासंदर्भात धग अजूनही कायम आहे.

नांदेड येथील दत्ता पाटील हडसणीकर हे मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे 15 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर नांदेडच्या विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण रूग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला आहे पण ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत.

यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला असून काही संघटनांनी त्यांना पाठिंब्याचे निवेदने दिले आहे. या उपोषणाचे पडसाद तालुक्यात उमटले असून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत उपोषणास पाठिंबा दिला.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी हडसणीकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही लावून धरणारच आहोत, त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे, अशी विनंती त्यांनी केली. तसेच हडसणीकर यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य सरकारने तातडीने त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

SCROLL FOR NEXT