महाराष्ट्र बातम्या

मंत्र्या-मंत्र्यात जुंपली! ''भुजबळांनी जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करु नये'', शंभूराज देसाई आक्रमक

संतोष कानडे

मुंबईः मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असूनदेखील सरकारवर आक्षेप घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचा विचार सरकारने केला आहे. त्यांचं कालचं विधान आश्चर्यकारक असल्याचं विधान शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मराठावाडा दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील, शिंदे समिती आणि सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्याला आज मंत्री शंभूराज देसाई यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, भुजबळांनी आक्षेप घेतला की माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेब अंतरवालीमध्ये कसे गेले, त्यांनी तिथे सर.. सर केलं. परंतु तसं नाहीये. सरकराने सांगितल्यानंतर दोन्ही माजी न्यायमूर्तींनी तिथे गेले होते. भुजबळांनी ओबीसींमध्ये गैरसमज निर्माण करु नये.

देसाई पुढे बोलले, महाराष्ट्रामध्ये जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण होईल, असं विधान भुजबळांनी करणं चुकीचं आहे. यामुळे राज्यात परिस्थिती खराब होऊ शकते. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. कदाचित उद्याच मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामध्ये आम्ही चर्चा करु.

''जबाबादार आणि वरिष्ठ मंत्र्याचं हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचं ठरलं होतं. मंत्रिमंडळात तशी चर्चा झाली होती‌'' असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

सोमवारी बीडच्या दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळांनी जाळपोळीची पाहाणी केल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे जात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणाले की, सरकारच्या शिंदे समितीवर आमचा आक्षेप आहे. माजी न्यायमूर्ती जरांगेंच्या भेटीला जातात, हे चुकीचं आहे. आमचे मंत्री, आमदार जरांगेंच्या भेटीला जताता त्यांना ओबीसींची मतं नकोयत का? गुन्हा मागे घेण्याची मागणी करणं आणि गुन्हे मागे घेणं हे चांगलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT