Eknath Shinde and Manoj Jarange Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन; जरांगे म्हणाले, तुमचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही...

मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा निघणार आहे. २६ तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा निघणार आहे. २६ तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे. कोट्यवधी लोक मुंबईत दाखल होतील, अशी भीती सरकारला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करत मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हा शब्द आम्ही दिलेला आहे. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाच्या पावित्र्यात जाण्यापेक्षा सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे.

जरांगे पाटलांचं उत्तर

शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली पडून दिला नाही. खरा दोष त्या मंत्र्यांचा आहे जे उपोषण सोडण्यासाठी आले होते. त्यांची जबाबदारी होती, प्रश्न सोडवण्याची. पण ते आता कुठे गेले आहेत?

सामंजस्याची भूमिका किती दिवस घ्यायची. सात महिने त्यामुळेच दिले होते. परंतु आम्हीतरी किती वेळ द्यायचा. समाजाने त्यांच्या शब्दाचा मानसन्मान ठेवला आहे. न्यायासाठी आता आम्ही मुंबईकडे निघणार आहोत, अशी भूमिका जरांगेंनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: उपराष्ट्रपतीसाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या, मुख्यमंत्र्यांचा मला फोन, खुलासा करत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Dada Bhuse : शालेय शिक्षणात ‘राष्ट्र प्रथम’ची संकल्पना; शिक्षणातून उद्याच्या भारताचा नागरिक घडणे आवश्यक

Live in relationship: प्रियकराने मृतदेहाचे केले सात तुकडे; पाय अन् डोके गायब; 'लिव्ह-इन'मुळे दुर्दैवी अंत!

VIRAL VIDEO: शिक्षिकेचा भन्नाट अंदाज! गाण्याच्या तालावर शिकवला मुलांना 'गुड टच-बॅड टच' धडा! कसा ते एकदा बघाच! व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Hartalika 2025 : यंदाची हरतालिका ठरणार या राशींसाठी शुभ, गौरी-शंकराची होणार कृपा !

SCROLL FOR NEXT