sambhaji raje
sambhaji raje 
महाराष्ट्र

मराठा आरक्षण: आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल

विनायक होगाडे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. आज संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेतली आहे. हे आंदोलन मागे घेणार नाही पण सरकारशी चर्चा सुरुच राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्यासमोर सहा प्रमुख मागण्या पुढे ठेवल्या होत्या. त्यासाठी काल आम्ही कोल्हापूरात मूक आंदोलन केलं होतं ज्याची सरकारने ताबडतोब दखल घेतली आणि आज बैठक घेतली. बैठकीत सारथीच्या मुद्यावर दीड तास चर्चा झाली. सरकारने सकारात्मक संवाद केला.

बैठकीत घेतलेले निर्णय

  • मूक आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल

  • येत्या गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडून तत्त्वत: मान्यता

  • वसतीगृहाच्या मुद्यांबाबत 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमधल्या वसतीगृहांसाठी सरकारकडून पैसे देण्यास मान्यता

  • शनिवारी सारथीबाबत अजित पवार बैठक घेणार

  • अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यातल्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन

  • सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वयक समिती स्थापन करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT