Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही"; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जालना इथं मनोज जरांगे हे कार्यकर्ते या आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसींमधून आरक्षण द्यावं या मागणीवर ते ठाम आहेत.

पण आता त्यांच्या या मागणीला स्वतः कुणबी समाज आणि ओबीसी समाजाकडून विरोध व्हायला लागला आहे. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Maratha Reservation Constitutionally not possible from OBC says Pankaja Munde)

सर्वांचा मराठा आरक्षणाचा पाठिंबा

पंकजा मुंडे म्हणाले, "मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडं आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होता. अगदी गोपिनाथ मुंडे असल्यापासून ते आत्ताच्या सर्व नेत्यांची याला मान्यता आहे"

संविधानिकदृष्ट शक्य नाही

पण आमची जी भूमिका आहे ती पहिल्यापासून स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे. पण असं कोण म्हटलं की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या? असं कोणी मगणी करणं आणि ते मिळणं शक्य नसतं. संविधानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरंखरं आरक्षण पाहिजे जे कोर्टात टिकेल ते दिलं गेलं पाहिजे"

हात जोडून विनंती करते

मराठा आरक्षणासाठी जे तरुण आत्महत्या करताहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी आहे ती करा, पण त्यासाठी स्वतःचा जीव वैगरे द्यायाचा विचार करु नका.

छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेनं लढा. स्वतःचा जीव देण्यासारखं लेकरांनी काम करु नये, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT