maratha reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ तारखेला

मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून लवकरच आरक्षणाच्या संबंधाने सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून लवकरच आरक्षणाच्या संबंधाने सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आलेली होती.

क्युरेटिव्ह पिटीशन कोर्टाने स्वीकारलं असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, २४ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. पिटीशन स्वीकारल्याने आशा निर्माण झाल्याचं विनोद पाटलांनी सांगितलं.

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरलीय. मात्र राज्य सरकारने हे शक्य नसल्याचं म्हटलं होतं.

मनोज जरांगे यांनी २४ तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. मुख्यमंत्र्यांनी मात्र सरसकट आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे शनिवारी जरांगे पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. बीडमध्ये होत असलेल्या सभेत ते भूमिका जाहीर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT