Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : 'सगेसोयरे' अधिसूचनेविरोधात पहिली याचिका दाखल; मुंबई हायकोर्टात 'यांनी' घेतली धाव

First petition filed against notification in Bombay High Court: मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे. "सागेसोयरे" व "गणगोत" यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे. 'सागेसोयरे' व 'गणगोत' यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे.

ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे ऍड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल केली. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २६ जानेवारी रोजी अधिसूचना काढून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं नोटिफिकेशन काढलं असून १६ फेब्रुवारीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांनी विरोध केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी इशारा दिला. 'जर ते सगेसोयऱ्यांच्या बाबतीत कोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन' असं जरांगे म्हणालेत. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून न्यायालयीन लढाया लढल्या जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT