maratha reservation manoj jarange patil  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: सरकारकडं आता केवळ दीड तासांचा वेळ! रात्री ९ नंतर पाणी घेणार नाही; जरांगेंचा निर्धार

मनोज जरांगेंनी पुन्हा स्पष्ट केली भूमिका

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्नावर आद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यापार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आज संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास पुन्हा आपली भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी सरकारला केवळ दीड तासांचा वेळ दिला आहे. अन्यथा रात्री ९ नंतर आपण पाणी देखील घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. (Maratha Reservation govt now has only one and a half hours No water after 9 pm says Manoj Jarange)

जाणूनबुझून खोटे गुन्हे दाखल

जरांगे म्हणाले, महाराष्ट्र सरकारनं जाणून बुझून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुरु केलं आहे. पण मी सरकारला सांगतो की तुम्ही किती खोटे केसेस करणार. सहा कोटी मराठ्यांवर तुम्ही किती केसेस करणार? आम्ही काही कमी नाही. (Latest Marathi News)

उलट केसेस केल्यामुळं लोकांमध्ये जास्त रोष निर्माण व्हायला लागला आहे सरकारविषयी. तुम्हाला अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिला तर तुम्ही देखील कोर्टामार्फत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा. वकील बांधवांनी आपल्या बांधवांच्या मदतीसाठी तातडीनं जावं.

सर्व जबाबदारी सरकारची

मी न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही. मी पाणी घ्यायचं पुन्हा आजपासून बंद केलं आहे. सर्व पुरावे आहेत तरीही सरकार मराठ्यांना जाणीवपूर्वक आरक्षण देत नाहीत. काही जाती अशा आहेत की त्यांना पुरावे नसताना आरक्षण दिलं. आमच्याकडं आता एवढाच एक पर्याय आहे. नाईलाज आहे आमचा. आम्हाला कठोर लढावं लागेल. होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी सरकारची आजपासून. (Marathi Tajya Batmya)

परिणाम खूप वाईट होणारेत

दररोज बैठका कशासाठी घेता. एकदाच काय त्या पन्नास बैठका घ्या. रोज बैठका घेऊन काय लोकं मारता का? शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब याचे परिणाम खूप वाईट होणारेत. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. मी आजपासून पाणी स्पष्टपणे सोडलं आहे. आता माझं कधी बोलणं बंद होईल मी सांगू शकत नाही. महाराष्ट्राचं जे होईल ते होईल आता बघणारे बघत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT