Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात पार पडणार महत्त्वाची सुनावणी

Maratha Reservation: राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच याबाबतची सुनावणी पार पडणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही झाला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने, सभा, रास्ता रोको करण्यात आले. अशातच मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर 6 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 6 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता याबाबत पहिली सुनावणी पार पडणार आहे. या याचिकेवर आता मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशातच आता सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.(curative petition on Maratha reservation)

दरम्यान मराठा आरक्षणावर सुनावणी घ्यायची की नाही यावर उद्या निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरिटीव्ह पिटीशन मांडण्याचा प्रयत्न 13 ऑक्टोबरला करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने आम्ही योग्य वेळी दाखल करून घेऊ असं सांगितलं होतं. अ‍ॅड. मनिंदर सिंह यांनी पिटीशन दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 20 एप्रिलला 2023 ला 1:30 वाजता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली होती. न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच ही चर्चा पार पडली होती. चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाचा निकाल देणारे सर्व न्यायाधीश यावेळी उपस्थित होते.

न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार करणं का गरजेचं आहे? यावर चर्चा झाली होती. त्यानंतर या याचिकेवर झालेल्या चर्चेनंतर सुनावणी घ्यायची की नाही यावर न्यायाधीश चर्चा करून निर्णय देणारं होते. त्यानंतर हे प्रकरण कोणत्या घटनापीठाकडे वर्ग करायचे (काही न्यायाधीश निवृत्त)याचा निर्णय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड घेणार होते.

मात्र, मराठा आरक्षणाबाबतची रिव्ह्यू पीटीशन फेटाळल्यानं घटनापीठ तयार करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. EWS आरक्षण देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्यावतीने मांडण्यात येणार होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात ही पुनर्विचार याचिका फेटाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

SCROLL FOR NEXT