Manoj Jarange Patil eSakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य; दीपक केसरकरांनी दिली माहिती

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो".

वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधित करत आहेत. यासाठी सकाळ पासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाचा जनसागर लोटला आहे. मनोज जारांगे पाटील काय संबोधित करणार आहे. याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागून राहिले आहे. तर आता दुपारी उन्हाची तीव्रता वाढू लागली असताना देखील मराठा बांधव मोठ्या उत्साहात घोषणाबाजी देत जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

आज सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंर मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर येऊन सर्व आंदोलकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगितले होते, शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. सर्व मराठा आंदोलक शिवाजी चौकाकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे काही वेळातच जीआर देखील वाचून दाखवणार आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT