Manoj Jarange patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Manoj Jarange Patil Interview: ''याबाबतीत आपलं हाडच बाटलेलं नाही. हे जर कुणी नार्को टेस्ट करुन सिद्ध केलं तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन, नाहीतर करणाराला तरी आत्महत्या करावी लागेल. लहानपणापासून दारु हा विषय बघितलेलासुद्धा नाही.''

संतोष कानडे

Maratha Reservation: मागच्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे आणि सरकारला सळो की पळो करुन सोडणारे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 'सरकारनामा'साठी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. माधव सावरगावे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये आजपर्यंत कधीही उजेडात न आलेल्या बाजूंवर प्रकाश पडला.

मनोज जरांगे पाटलांवर टीका करताना विरोधकांनी कायम त्यांना, चपटी घेऊन बोलतात.. देशी घेतात; अशा टीका वारंवार केल्या. ज्या लक्ष्मण हाके यांनी जालन्यात जरांगेंविरोधात दोनवेळा उपोषणं केली त्यांनीही, जरांगे चपटी मारुन बोलतात, असं म्हणत टीका केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये हाकेंवर मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी करत त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले होते.

याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटलांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला.

''आंदोलन सुरु झाल्यापासून तुम्ही काय पिता, काय खाता? याबद्दल चर्चा सुरु आहे. त्यामुळे एक प्रश्न पडतो तुम्ही पिता का?''

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''मी पाणी पितो. बाकी काही पीत नाही. पाणी ज्याच्यात टाकून पितात ते मी पीत नाही. ते आपल्याया जमत नाही. त्याबद्दल माझं हाडच बाटलेलं नाही.''

सोशल मीडियात चपटीचे फोटो, देशीचा फोटो टाकून व्हायरल केले जातात,

त्यावर जरांगे म्हणाले, ''याबाबतीत आपलं हाडच बाटलेलं नाही. हे जर कुणी नार्को टेस्ट करुन सिद्ध केलं तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन, नाहीतर करणाराला तरी आत्महत्या करावी लागेल. लहानपणापासून दारु हा विषय बघितलेलासुद्धा नाही.''

पहिल्यांदा थम्सअपची चव चाखली

''एक अनुभव सांगतो, दहावीची परीक्षा असताना सर्व पोरं आम्ही चकलांब्याला गेलो होतो. तेव्हा थम्सअप किंवा झमझम असं काहीतरी नवीन आलं होतं. पोरापोरांनी एक थम्सअपची बाटली विकत घेतली. मी त्यात बोट टाकून जिभेवर ठेवलं तर चुणचुण लागलं.. मला वाटलं दारुच आहे, मी थेट पळालो आणि मातोरीत गेलो.'' हा किस्सा जरांगेंनी शेअर केला.

''खाण्याच्या आवडीमध्ये व्हेज की नॉन व्हेज? कुठला डबा आधी घ्याल?''

या प्रश्नाच्या उत्तरात जरांगे म्हणाले, ''आधी व्हेज घेईन. सुरुवात व्हेजनेच होणार. आम्ही आधीपासून आईच्या हातचं खाल्लेलं आहे. तेव्हा तेल, मीठ नसायचं. भाजी तर लांबच. चटणीवर दिवस काढायचो.. वाईट दिवस काढलेत आम्ही. मला खायला काही विशेष लागत नाही. जे असेल ते मी खातो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT