Manoj Jarange Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको अन्...'' मनोज जरांगेंनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा

सरकारने सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. येत्या २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.

संतोष कानडे

अंतरवाली सराटीः सरकारने सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. येत्या २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्यापासून मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी निवेदन द्यावं. २४ तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तो रोको करायचा. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

''कालचं आरक्षण आपल्या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे. परंतु ते आरक्षण आम्हाला नकोय. देशतली ही पहिली घटना आहे गरीबांनी श्रीमंतांना आरक्षण दिलं. ज्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होते, त्यांना मिळालं आहे. तेही आरक्षण रद्द झालं तर मराठ्यांच्या तरुणांचं सात वर्षांचं नुकसान होईल.'' अशी भीती जरांगेंनी बोलून दाखवली.

मनोज जरांगे यांच्या मागण्या

  • कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावं

  • सगेसोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा

  • नसता हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी-मराठा एकच असल्यचा निर्णय घ्या

  • एका ओळीचा आदेश काढून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा

  • अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या

  • माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ द्या

यावेळी बोलताना जरांगे यांनी साल्हेर किल्ल्याजवळ ताफ्यात ब्रेक फेल झालेले पिकअपसारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, यावरून गंभीर आरोप केले. त्या घातपातासाठी कार्यकर्ता कोणी पाठवला होता ते मला माहिती आहे, गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे, सखोल चौकशी करावी. नाहीतर मला नाव सांगायची वेळ येईल असंही यावेळी जरांगे म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT