महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: 'पाणी प्या...पाणी प्या' समाजाची हात जोडून आर्त विनंती! जरांगे भावूक, घेणार चार घोट पाणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अन्नपाण्याशिवाय उपोषणावर ठाम आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अन्नपाण्याशिवाय उपोषणावर ठाम आहेत. पण त्यांची प्रकृती खालावत चालल्यानं आता समाजानं त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करत आहे. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका घेतली. समाजाच्या या विनंतीनं भावूक होत अखेर जरांगेंनी चार घोट पाणी पिण्याचं मान्य केलं आहे. (Maratha Reservation Maratha community emotional apeal to Manoj Jarange for taking water)

'पाणी प्या, पाणी प्या'

मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्यानं मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. यावेळी मोठ्या जनसमुदायानं जरांगे यांच्यासमोर हात जोडून सामुहिकरित्या त्यांना 'पाणी प्या, पाणी प्या' अशा शब्दांत आर्त विनंती केली. आम्हाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी भूमिका यावेळी त्यांनी घेतली. (Latest Marathi News)

चार-पाच घोट पाणी घेणार

सामाजाचं हे प्रेम पाहून यावेळी मनोज जरांगे काही क्षण भावूक झाले तसेच त्यांनी पाणी पिण्याचं मान्य केलं. तुमच्यासाठी चार-पाच घोट पाणी घेतो, असं त्यांनी मान्य केलं. त्यानंतर उपस्थितांनी जोरात जल्लोष केला. यावेळी जरांगे यांचे डोळे काहीकाळ पाणावलेले दिसून आले. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT