manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा तरुणाने आत्महत्या करणं हे सरकारचेच पाप ; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservation: मराठा समाजाच्या सुनील कावळे या तरुणाने केलेली आत्महत्या हे सरकारचे पाप असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातील एकाचेही बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. सरकारने आरक्षणाविषयी येत्या २२ तारखेपर्यंत निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन सरकारला पेलवणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील आज (ता. १९) नवी मुंबईत आले होते. या वेळी मराठा समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आपल्या आंदोलनाविषयी माहिती देताना त्यांनी मुंबईत घडलेल्या प्रकाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होत असताना सरकार मात्र आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे ते म्हणाले. सरकारने आमच्याकडून वेळ घेतलेली आहे. त्याबद्दल सरकारकडून अजून अधिकृत माहिती आलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक तरुण शहीद झाले आहेत. याला सरकारच जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात होणाऱ्‍या जाहीर सभेविषयी बोलताना ते म्हणाले, आपण कुणाच्याही बालेकिल्ल्यात नाही. बालेकिल्ला म्हणून कोणताही परिसर मानत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा मराठा समाजाचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी जाऊन मी मराठा आरक्षणाविषयी सरकारला जागे करण्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याचेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT