Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका; सुनील तटकरेंचे आवाहन!

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आगामी कालावधीत आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करून आपला जीव गमावू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

नेरूळ येथील ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलताना शेतकऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत विचार-विनिमय सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा आरक्षण दिले; परंतु कायद्याच्या चौकटीत आरक्षण न बसल्याने मराठा समाजाला उपेक्षित राहावे लागले. आताचे सरकार केवळ आरक्षणाची घोषणा करणारे नसून न्यायालयात टिकेल अशा प्रकारचे आरक्षण देण्याचे भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशा तिघांच्या सरकारची दमदार कामगिरी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून अनेकांना यामध्ये स्थान द्यावे, अशी आपली मागणी असल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT