Maratha-Reservation 
महाराष्ट्र बातम्या

'वैद्यकीय'साठी मराठा आरक्षण लागू

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - विधानसभेने संमत केल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचे विधेयक शक्रवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू केला. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले. मात्र, कायदा अस्तित्वात येण्यापबर्वीच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा ठपका ठेवत यंदा आरक्षणाचा लाभ देण्यास न्यायालयाने मनाई केली होती. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. राज्य सरकारने या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते गुरुवारी विधानसभेत मांडले होते. तेथे हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधान परिषदेतही हे विधेयक शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT