Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; तीन अधिकारीही निलंबित

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेसंबंधी माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्वपक्षीय बैठकीत इतर नेत्यांनी ती व्यक्त केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधिता राहावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्या-ज्या वेळी राज्यावर संकट आलं तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. शेवटी संवाद आणि सुसंवादातून मार्ग निघत असतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वपक्षांनी ठराव पारीत केला असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे, असं सर्वांनी म्हटलेलं आहे. त्यांनी जस्टीस शिंदे साहेबांच्या कमिटीला वेळ द्यावा, कमिटीमध्ये जरांगे पाटलांचे सदस्य येऊ इच्छित असतील तर तोही निर्णय घेतलेला आहे.

जालना येथील आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानुसार एक उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. आंदोलकांची मागणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची होती. त्यानुसार खाडे, आघाव आणि आणखी एक अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्वपक्षीयांच्या मतानुसार मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घेतलं पाहिजे. त्यांनी गठीत केलेल्या समितीला वेळ दिला पाहिजे. समितीमध्ये जरांगे पाटील किंवा त्यांच्या सदस्याला घेतलं जाईल. तीन अधिकाऱ्यांनाही सरकारने निलंबित केलेलं आहे. याचा विचार करुन त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT