Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मनोज जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा, शेवट गोड होईल; दीपक केसरकरांची विनंती

कार्तिक पुजारी

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपत आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी सभांचा धडाका सुरु केला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार नरमाईच्या भूमिकेत गेल्याचं दिसत आहे. कारण, सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं.मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी उपोषण सुरु केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर त्यात आणखी १० दिवसांची वाढ करण्यात आली. सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अल्टिमेटम संपण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी सभांचा धडाका लावला आहे. सरकार २४ तारखेच्या आधीच आरक्षण देईल असा विश्वास त्यांना आहे. २४ तारखेनंतरही आरक्षण देण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यावेळी सरकारला आंदोलन झेपणार आणि पेलवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वात समिती स्थापन केली होती. या समितीने आणखी दोन महिन्यांचा कालावधी मागितला असल्याची माहिती आहे. सरकारने यावर अद्याप काही निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT