Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, नागरिक-पोलीसात जोरदार हाणामारी

दिलीप दखने

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा आक्रोश मोर्चाचं आंदोलन सुरु होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.

अंतरवाली सराटी तालुका अंबड येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलीस आले असता मंडपातील नागरिक व पोलीसांचा मोठा राडा झाला.

या दरम्यान बाचाबाची होऊन दगडफेक, लाठीचार्ज झाला. यामध्ये गावातील अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पोलीस देखील जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज शुक्रवारी तालुका १ रोजी गालबोट लागले.

अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलीस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.

या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर बीड , उप विभागीय पोलीस अधिकारी दराडे , उप विभागीय पोलीस अधिकारी मुकंद आघाव ,  स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ , पोलीस निरीक्षक  रविंद्र पेरगुलवार हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT