dasara melaw  esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melawa 2023: परंपरा मोडली ! मुंबईच्या डबेवाल्यांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे पाठ, सांगितलं कारण..

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दसरा मेळाव्यात सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबईचा डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

आम्ही बहुतांश डबेवाले आणि आमचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक आहोत. यापुढेही राहू; परंतु मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी व मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम पाहता यंदाच्या वर्षी डबेवाला शिवतीर्थावर मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. पहिले मराठा आरक्षण; नंतर पक्ष अशी आमची भूमिका आहे, असे तळेकर यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण हा मराठा जातीचा लढा आहे. तो आम्हालाच लढावा लागणार आहे. सध्या या लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य असल्यामुळे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आम्ही वाजत-गाजत, गुलाल उधळत जात होतो.

मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील; परंतु मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या लढ्याला शक्य तितके बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे तळेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatkal Ticket New Rules : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; रेल्वे स्थानकांवर लागू होणार नवी टोकन प्रणाली

Who is Saransh Jain? भारताच्या कसोटी संघात एन्ट्री घेणारा सारांश जैन कोण? त्याची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी का इतकी महत्त्वाची?

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

बापरे! ज्युनियर एनटीआर जखमी, खांद्याला झाली गंभीर दुखापत

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

SCROLL FOR NEXT