Maratha Reservation: 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मनोज जरांगे आक्रमक! तर सरकारने दिली मराठा समाजासाठी घेतलेल्या 20 निर्णयांची माहिती

मराठा समाज आक्रमक झाला असून आज मुंबईच्या दिशेन कुच करणार आहे. मराठा आंदोलनामुळे सरकार बॅकफूटवर आलं आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आज मुंबईसाठी निघणार आहेत.

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा समाज आक्रमक झाला असून आज मुंबईच्या दिशेन कुच करणार आहे. मराठा आंदोलनामुळे सरकार बॅकफूटवर आलं आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आज मुंबईसाठी निघणार आहेत. तर २६ जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी तीन वाजता बैठक बोलावाली आहे. यापूर्वी सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

सरकारने दिलेल्या निर्णयाची माहिती-

  • मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने राज्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदींचा डेटाबेस करुन कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणे सुकर झाले. (Maratha Reservation News in Marathi)

  • मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत दि. २३ जानेवारी २०२४ पासून सर्वेक्षण होणार, शासकीय यंत्रणा सज्ज.

  • सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील उपचारात्मक याचिकेसाठी शासनाकडून देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली.

  • कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याकरिता फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलावणार.

  • मा. सर्वोच्च न्यायालय, मा उच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाचत शासनास कायदेशीर सल्ला देण्यासाठी मा. मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय सल्लागार मंडळ नेमले आहे.

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत ७४ हजार ८७३ लाभार्थ्यांना ₹५ हजार ६५९ कोटी बँक कर्ज मंजूर त्यावरील ₹६०८.१२ कोटी रूपयांचा व्याज परतावा वितरित. महामंडळाकडून ३५ गट प्रकल्पांना ₹ ३.३५ कोटी कर्ज वितरित.

  • सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि ६ विभागीय कार्यालये आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. बांधकामासाठी ₹१ हजार १८८.८२ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता.

  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजने अंतर्गत ३ लाख ७९ हजार ३७३ विद्यार्थ्यांना ₹१ हजार २९३ कोटी निर्वाह भत्ता वितरित.

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ₹१ हजार २६२ कोटी मंजूर.

  • छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी ३२ हजार ६३९ विद्यार्थ्यांना ₹ ३१ कोटी वितरित. तसेच यावर्षी ४४ हजार १०२ विद्यार्थ्यांना ₹४२ कोटी मंजूर.

  • मराठा समाजाच्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व₹ २१ कोटी रूपयांची तरतूद. (Latest Marathi News)

  • मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय. प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष १ ६० हजार महानगराच्या ठिकाणी, ₹५१ हजार विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी, १ ४३ हजार जिल्ह्याच्या ठिकाणी आणि १३८ हजार तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करणार.

  • मराठा आरक्षण कायदा मा. सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती.

  • विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-१९ मुळे नोकरभरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एम. पी. एस. सी. व अन्य शासकीय सेवेत ३ हजार २०० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय, अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

  • सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या ५८ विद्यार्थ्यांची यु. पी. एस. सी. (१२ आय. ए. एस., १८ आय. पी. एस., ८ आय. आर. एस., १ आय. एफ. एस., २ भारतीय वन सेवा, ५ सी. ए. पी. एफ. व इतर सेवा १२) तर ३०४ विद्यार्थ्यांची एम. पी. एस. सी. मार्फत निवड.

  • सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत (पी. एच. डी. करीता) मराठा समाजाच्या २ हजार १०९ विद्यार्थ्यांना ₹ ११६.३४ कोटी वितरित.

  • इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्ती.

  • सारथीमार्फत ३६ हजार ७२६ विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.

  • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथीमार्फत सुरू

  • मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यरत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT