Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

आरक्षण देण्यात विरोधकांनी अडथळा आणू नये - मुख्यमंत्री

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याने यात विरोधकांनी कोणताही अडथळा आणू नये, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज सकाळी गटनेत्यांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, तर दुसरीकडे मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यापासून कामकाज ठप्प आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक बुधवारी विधानसभेत, तर गुरुवारी विधान परिषदेत मांडण्यात येणार आहे. कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट नेत्यांची बैठक बोलवली होती; परंतु अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. काल मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडली. आजही सभागृहात आरक्षणाच्या मुद्यावरून दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले, तर रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT