Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''मनोज जरांगेंच्या भूमिकेला माझा विरोध'', शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचं विधान

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांनी सरकारला दिलेला वेळ २४ ऑक्टोबर रोजी संपत असल्याने सरकार याबाबत काय निर्णय घेणार? हे बघावं लागणार आहे. त्यातच नारायण राणे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यानंतर आणखी एका नेत्याने भूमिका मांडली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध केला आहे. कोकणातला मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. कारण कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाही, असं थेट भाष्य रामदास कदम यांनी केलं आहे. शिवाय मनोज जरांगेंचा अभ्यास नाही, असंही ते म्हणालेत.

काय म्हणाले रामदास कदम?

कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मनोज जरांगेंच्या मागणीला माझा विरोध असून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मला मान्य नाही. कोकणामध्ये कुणबी आणि मराठा समाजामध्ये रोटीबेटी व्यवहार चालत नाही, हे जरांगेंना माहिती नसून त्यांच्या अभ्यास नाही. मी दाव्याने सांगतो कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही.

नारायण राणे काय म्हणाले होते?

कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे आहेत. त्यामुळे मीसुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मराठा आणि कुणबी एकच असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. परंतु ते तसं नाही. मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे, तसा तो जरांगे पाटलांनीही करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT