manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : गावात राजकीय नेत्याला पाय ठेवू देणार नाही; 25 पासून जरांगे औषधही घेणार नाहीत

संतोष कानडे

अंतरवालीः मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत २४ तारखेला संपत आहे. त्यामुळे २५ तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. या उपोषणादरम्यान आपण पाणीही घेणार नाही आणि औषधही घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

केवळ अतंरवालीतच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये मराठ्यांनी २५ तारखेपासून साखळी उपोषण सुरु करावं, असं आवाहन त्यांनी केलं. जरांगे म्हणाले की, 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु करत आहे. या काळात गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही.. आरक्षण घेऊनच गावात यायचं नाहीतर गावच्या शिवालासुद्धा शिवू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून कुणीही उग्र आंदोलन करु नये, असं आवाहन त्यांनी राज्यातल्या मराठा बांधवांना केलं. पुढे २८ पासून साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे कुणीही आत्महत्या करु नये, असं ते म्हणाले.

घटनेच्या पदावर असलेले पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी गावात न येण्याबाबत जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाची भूमिका घेतली तरच आंदोलन मागे घेतलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. आमचं आंदोलन शांततेत होणार असून कुठेही गालबोट लागणार नाही, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT