Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : हा घ्या पुरावा! कुणबी पुराव्यांसाठी मराठ्यांनी आणली 250 वर्षांपूर्वीची भांडी

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बुधवारपासून मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यात जावून निजामकालीन आणि त्यापूर्वीचे पुरावे तपासणार आहे.

नियुक्त केलेली शिंदे समिती बुधवारी छत्रपती संभाजी नगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाली. या समितीला पुरावे म्हणून दाखवण्यासाठी चक्क भांडी आणण्यात आणली होती. या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, असा दावा करण्यात येतोय.

मराठा पंचकमिटी बेगमपुरा यांच्याकडून दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीची तांबा-पितळीची भांडी समितीला पुरावे म्हणून दाखवण्यात येणार आहेत.

मराठा पंचकमिटी बेमगपुरा यांच्यावतीने आंदोलकांनी सांगितलं की, आमच्याकडे अत्यंत पुरातन भांडी आहेत. या भांड्यावर कुणबी, अशा नोंदी आहेत. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर होई.

२०१८मध्ये आलेल्या गायकवाड समितीसमोरदेखील हीच भांडी ठेवण्यात आलेली होती. परंतु हे पुरावे ग्राह्य धरले नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. शिंदे समिती ही भांडी आणि त्यावरील वेगवेगळ्या भाषेतील नोंदी पुरावे म्हणून ग्राह्य धरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला वेळ संपत असल्याने त्या दिवशी मेळावा होईल. राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

Ambegaon farmer loan waiver: आंबेगावात १,५७८ शेतकऱ्यांना ९ कोटी ८५ लाखांची कर्जमाफी; आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

SCROLL FOR NEXT