Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: आरक्षणाचं पत्र हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही; जरांगे पाटील भूमिकेवर ठाम

कार्तिक पुजारी

जालना- सर्वपक्षाच्या बैठकीतील ठरावाची प्रत मनोज जरांगे पाटील यांना अर्जून खोतकर यांनी दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ते आज काय निर्णय घेतीय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आरक्षणाचं पत्र सर्वसामान्य मराठ्याच्या हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडलीये.

तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही. मी तुमच्यापुढे जाणार नाही. मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच बैठक घेतली. सर्व पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ठरावाची प्रत मला देण्यात आली आहे. मी पारदर्शकपणे काम करतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकारला ४० वर्षे आपण दिली आहेत. सरकारने एका दिवसात जीआर काढला आहे, पण ते न्यायालयात टिकणार नाही. महिन्याचा वेळ दिला तर न्यायलयात टिकणारं आरक्षण देणार का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, पण गैरसमज नको. मी सध्या द्विधा मनस्थितीत आहे. मला त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितलाय, असं जरांगे पाटील म्हणाले.

एक महिन्यानंतर सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईपर्यंत मी घरी जाणार नाही. समितीचा अहवाल एका महिन्याने काहीही येवो, पण सर्व मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायलाच हवं. सरकारला ४० वर्षे दिले आहेत, त्यामुळे आणखी एक महिना द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पण, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असं ते म्हणाले.

आपण एकत्र असल्याने सरकार आपल्यासमोर झुकलं. तुमच्याशी चर्चा करुनच निर्णय घेईन, असा विश्वास जरांगे पाटील यांनी दिला. मंत्री उदय सामंत हे विशेष विमानाने उपोषण स्थळी आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेत घेऊन ते जरांगे पाटलांची भेट घेत आहेत. (Latest Marathi News)

निजामकालीन नोंदीमध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणापत्र देण्यासाठी राज्य सरकारने जीआर काढला आहे. तसेच ही सर्व प्रक्रिया सुरळीत व्हाही यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT