Eknath Shindeand Manoj Jarnge Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मुख्यंमत्री-जरांगेंच्या भेटीबाबत संभ्रम; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

कार्तिक पुजारी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट न घेण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळाशी चर्चा सुरु आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे जरांगे पाटील यांची भेट न घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आंदोलन स्थळी यावे अशी अट घातली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. त्यामुळे जे काही विघ्नसंतोषी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

आंदोलन आणि आरक्षण याबाबत सरकार गंभीर आहे. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेला येत असताना आम्ही बोलत बोलत येत होतो. प्रॅक्टिकल चर्चा झाली होती. रात्रभर चर्चा झाली होती. तिघांनी ठरवलं होतं की, उपोषणावर बोलू त्या व्यतरिक्त राजकीय काहीही वक्तव्य करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण, काहींनी व्हिडिओचा भाग कट करुन सादर केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय कोणतीही राजकीय विषयाची चर्चा नको असं आम्ही ठरवलं होतं. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा अर्थ काढून आणि चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सादर करण्यात आला. नेमका काही भाग काढून संभ्रम निर्माण होईल असा व्हिडिओ समोर आणला. सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाही हे दाखवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिंदेंनी केली.

राज्यात काही विघ्नसंतोषी लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळालं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. हायकोर्टानेही ते मान्य केलं होतं. पण, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. कोणाचं अपयश हे मी आता बोलणार नाही. मराठा आरक्षण मिळालं अशी आमची भूमिका आहे. तज्ज्ञ लोकांशी याबाबत चर्चा केली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काही लोक जाणीव पूर्वक मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करत आहेत. कोणीही याला बळी पडू नका, मराठा समाजाच्या पाठिमागे मी खंभीरपणे उभा आहे. आमची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट आहे. दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडू नये. कायदा व सुवस्था टिकवणं आवश्यक आहे. विरोधकांनी खोडसाळपणा करु नये, असं ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT