Manoj Jarange Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: 'आज रूग्णालयातून डिस्चार्च, दोन दिवस आराम अन् राज्यभर दौरे....', मनोज जरांगेंची रणनिती ठरली!

Manoj Jarange: 'आज रूग्णालयातून डिस्चार्च, दोन दिवस आराम अन् राज्यभर दौरे....', मनोज जरांगे रणनिती ठरली!

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून राजकारणही चांगलंच तापल्याचं दिसून आलं. मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्च मिळणार आहे. त्याआधी आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितलं आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

"आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांची रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर भेट घेणार आहे. तसेच दोन दिवस आराम करुन १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्रातील दौरा सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आहेत.

"मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात आहेत. त्यांचे दुःख मोठे आहे. सर्वत्र दुःखाचे सावट आहे, अशात सण कसा साजरा करु" असं म्हणत यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होत असल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. दोन चार दिवस लेट मिळतील. पण आत्महत्या करू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो. आता ऐका. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. तुम्हालाही मिळणार आहे. सर्वांनी आणखी आरक्षण मिळण्यासाठी कामाला लागा, तुम्ही आत्महत्या करू नका. शांततेत आंदोलन करण्यासाठी तयार रहा, असंही ते पुढे म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT