Devendra Fadnavis and Nana Patile sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत? नाना पटोलेंचा सवाल

मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सांगत होते, मग आता ते आरक्षण का देत नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सांगत होते, मग आता ते आरक्षण का देत नाहीत. हे सरकार मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत. ते मुंबईत पोहचले तर काय स्थिती होईल याचा विचार गृहमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे. मराठा आंदोलकांना मुंबईत यावे लागत आहे हे सरकारचे पाप आहे.

राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी सगळे श्रीमंत लोक उपस्थित होते, पण गरिबांचे सरकारला काही पडले नाही, राम हा गरिबांचा सुद्धा आहे. हे सरकार लोकांना येड समजत आहे. पण आधी एकनाथ देवेंद्र यांचे ‘इडी’ सरकार होत, आता त्यात अजित पवारांचा ए जोडला गेल्याने हे ‘येडा सरकार’ आहे अशी बोचरी टीका पटोले यांनी केली.

उमेदवारीसाठी अंतर्गत सर्वेक्षण

पुण्यात लोकसभेसाठी २० जणांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिल्लीत जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय काँग्रेस कमिटीसह प्रदेश काँग्रेसने देखील अंतर्गत सर्वेक्षण सुरु केले आहे. जो सक्षम उमेदवार असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT