Rohit Pawar, Devendra Fadnavis and Ajir pawar eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : तीन इंजिनांनी दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी; रोहित पवारांचा टोला

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून सत्ताधारी अडचणीत आल्याचं चित्र आहे. तर विरोधक सातत्याने टीका करत आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारमधील मंत्री प्रयत्नशील आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी संसदेतूनच प्रयत्न करावे लागतील, असा दावाही करण्यात येतोय. यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की ,कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता, सरकारने मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची हिंमत दाखवायला हवी. या तीन छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल त्यांच्या दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हान रोहित पवार यांनी राज्य सरकारला आहे.

केंद्राच्या अधिवेशनात धनगर समाजाचा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुद्दा जर हे त्रिकूट सरकार मांडू शकत असेल तर आम्ही त्यांना मानू. ईडब्ल्युएसच्या बाबतीत हे शक्य आहे. त्यामुळे अधिवेशनात इतर समाजाचे आरक्षण कमी न करता, मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय सरकारने मांडावा, असंही रोहित पवार यांनी म्हटलं. राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे आहेत. यावरून सरकारला ट्रिपल इंजिनच सरकार म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT