Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ‘सगेसोयरें’ विरुद्ध आठ लाख हरकती;परिपत्रक मागे घेण्याची मागणी

राज्य सरकारने ‘सगेसोयरें’च्या परिपत्रकाची अधिसूचना काढावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून सरकारवर दबाव आणला जात असला तरी या ‘सगेसोयरें’बाबत मागविलेल्या साडेआठ लाख हरकतींपैकी ‘सगेसोयरें’चे परिपत्रक मागे घेतले जावे यासाठी तब्बल सात लाख ६५ हजारपेक्षा जास्त हरकती राज्य सरकारकडे आल्या आहेत.

दीपा कदम

मुंबई : राज्य सरकारने ‘सगेसोयरें’च्या परिपत्रकाची अधिसूचना काढावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून सरकारवर दबाव आणला जात असला तरी या ‘सगेसोयरें’बाबत मागविलेल्या साडेआठ लाख हरकतींपैकी ‘सगेसोयरें’चे परिपत्रक मागे घेतले जावे यासाठी तब्बल सात लाख ६५ हजारपेक्षा जास्त हरकती राज्य सरकारकडे आल्या आहेत. सगेसोयरेंची अधिसूचना काढली जावी यासाठी जेमतेम दीड लाख जणांनीच पाठिंबा दिला आहे. यामुळे अधिसूचना काढण्यावरून राज्य सरकारची कोंडी झाली आहे.

राज्य सरकारने ‘सगेसोयरे’चे परिपत्रक २६ जानेवारी २०२४ रोजी काढले होते. हे परिपत्रक लागू करण्यापूर्वी हरकती मागविल्या होत्या. साडेआठ लाखांपेक्षा अधिक हरकती आणि पाठिंबा सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झाल्या. या हरकतींची तीन भागात विभागणी करण्याचे काम सुरू होते. अधिसूचनेला पाठिंबा, अधिसूचनेला हरकत घेऊन रद्द करण्याची मागणी आणि अधिसूचनेत सुधारणा असे स्वरूप होते. हे काम पूर्ण झाले आहे.

सगेसोयऱ्यांवर आलेल्या हरकतींचे स्वरूप कसे आहे, हे राज्य सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात लाख ६५ हजारपेक्षा अधिक लोकांनी हे परिपत्रक लागू केले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. दीड लाख लोकांनी हे परिपत्रक लागू केले जावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मराठा आंदोलकांच्या मागणीनुसार ‘सगेसोयरें’चे परिपत्रक राज्य सरकारने काढले असले तरी ओबीसी समाजाने या परिपत्रकाला विरोध केला आहे.

सरकारची नवीन व्याख्या

‘सगेसोयरे - सगे सोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये स्वजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाइकांना, पितृसत्ताक पद्धतीतील सग्यासोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्तातील सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल, असा स्पष्ट मसुदा सरकारने केला.

‘कुणबी’बद्द भूमिका

दरम्यान, स्वजातीत विवाह झाले असले तरी कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या मुलीचा विवाह कुणबी जात प्रमाणपत्र नसलेल्या कुटुंबात झाला तर तिच्या पतीला आणि त्याच्या कुटुंबीयांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याच्या विधी व न्याय विभागाने घेतली आहे

सगेसोयरे’बद्दल राज्य सरकारने प्रसिद्घ केलेल्या मसुद्याची अधिसूचना काढण्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव न काढण्याचे बंधन सरकारवर नाही. जरी एखाद्या परिपत्रकावर, धोरणावर सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या तरी त्या मान्य करणे किंवा फेटाळणे याचा पूर्णपणे सरकारला अधिकार आहे. ‘सगेसोयरें’च्या धोरणाला बहुसंख्याक प्रमाणात विरोध झाला असला तरी सरकारने ठरवले तर ते लागू करता येते.

- अनंत कळसे,

माजी प्रधान सचिव, विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

SCROLL FOR NEXT